मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण, ‘असा’ असेल चंद्रावर पोहोचण्याचा प्रवास, जाणून घ्या…
श्रीहरीकोटा : चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. 23-24 ऑगस्ट दरम्यान कधीही, ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मॅंझिनस-यू विवराजवळ उतरेल. LVM3-M4 रॉकेटने चांद्रयान-3 ला 179 किमी पर्यंत नेले. त्यानंतर त्याने चांद्रयान-3 ला पुढे प्रवासासाठी अवकाशात ढकलले. या कामात रॉकेटला फक्त 16:15 मिनिटे लागली. LVM3 रॉकेटने ज्या कक्षेत चांद्रयान-3 प्रक्षेपित केले आहे ती 170X36,500 किलोमीटर लांबीची लंबवर्तुळाकार […]
अखेर ठरलं! राष्ट्रवादीला मिळणार ‘ही’ महत्त्वाची मंत्रिपदे
मुंबई : महाराष्ट्रात प्रदीर्घ संघर्षानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त मंत्र्यांच्या खात्यांच्या विभागणीवर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. अर्थमंत्रालयासह सात महत्त्वाची मंत्रालये राष्ट्रवादीच्या कोट्यात आली असून, त्यासाठी अनेक दिवसांपासून चुरस सुरू होती. याशिवाय नियोजन, अन्न व नागरी पुरवठा, सहकारी संस्था, महिला व बालविकास, कृषी, मदत व पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण ही खाती राष्ट्रवादीला मिळणार आहेत. […]
महाप्रित उपकंपनी स्थापनेस शासन मान्यता
मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या “महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिक मर्यादित” (महाप्रित) या उपकंपनीच्या स्थापनेस शासन मान्यता देण्यात आली आहे. या कंपनीच्या उत्पन्नातून सुमारे 80 टक्के निधी हा राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी […]
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्ष मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई : आठ वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपये किमतीच्या शासकीय रोख्यांची विक्री (७.३३% महाराष्ट्र शासनाचे रोखे २०३१) अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व […]
विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि आवड लक्षात घ्यावी – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि विद्यार्थ्यांची आवड या दोन्ही बाबी प्राधान्याने विचारात घ्याव्यात, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. समितीचे सदस्य प्रसिद्ध शेफ विष्णू […]
महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात पर्यावरण, कृषी, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन, शिक्षण, आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आदी क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव असल्याचे सांगत थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. वर्षा निवासस्थानी कांग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट […]
सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक, सुयोग्य जमिनींची निश्चिती त्वरित करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधील सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक सुयोग्य जमिनींची निश्चिती योग्यता तपासून त्वरित करावी. या जमिनी नोडल एजन्सीला हस्तांतरित करण्यासाठी अभियान स्तरावर काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी अपर मुख्य सचिव राजगोपाल […]
पावसाळ्यात वाढतो डेंग्यूचा धोका, लवकर बरे होण्यासाठी घ्या ‘हा’ विशेष आहार…
पुणे : डेंग्यू हा आजार एका विशिष्ट डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. देशात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. डेंग्यू विषाणू डासांमुळे पसरतो जे दूषित पाण्यामध्ये वाढतात. हा आजार होण्यापासून बचाव करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपला परिसर स्वच्छ ठेवणे आणि खराब पाणी जमा होण्यापासून प्रतिबंध करणे. प्रतिबंध करणे हे उपचारापेक्षा नेहमी चांगले असते, परंतु कधीकधी प्रतिबंध […]
सप्तश्रृंगी घाटात २२ प्रवाशांसह बस दरीत कोसळून भीषण अपघात, मृत महिलेच्या वारसाला दहा लाखांच्या मदतीची घोषणा
नाशिक : नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर २२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही प्रवाशांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या […]









