मुंबई : मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. मंत्री राठोड म्हणाले की, शासन अधिसूचना दि.21 सप्टेंबर 2021 नुसार जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या पदांचे सेवाप्रवेश नियम अधिसूचित करण्यात […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
हे शासन कलाकारांना संधी देणारे अन् त्यांचा सन्मान करणारे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : एखाद्या कलाकाराकडे कितीही प्रतिभा असली तरी त्याला संधी मिळणे महत्त्वाचे असते. हे शासन कलाकारांना संधी देणारे आणि त्यांचा सन्मान करणारे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे महानगरपालिका व ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन व पारितोषिक वितरण’ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संदीप माळवी, माजी […]
जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५ दिवसांच्या दौर्यावर रवाना
मुंबई : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 दिवसांच्या जपान दौर्यावर रवाना झाले. या दौर्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्याही ते या दौर्यात भेटी घेणार असून, जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकार्यांनाही ते भेटतील. जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना […]
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ शिवनेरी बसचा अपघात, 14 प्रवाशी किरकोळ जखमी
पुणे : पुणे नाशिक महामार्गावर आज सकाळी शिवनेरी बसचा अपघात झाला. ही बस पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात असताना नारायणगाव बायपासला समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी चालकाने बस विरुद्ध दिशेला वळवली. यावेळी कंटेनर आणि शिवनेरी बसचा अपघात झाला. या अपघातात 14 प्रवाशी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, अपघातग्रस्त बसचे दरवाजे लॉक झाल्याने समोरील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात […]
कॅसिनो कायदा अखेर रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले अनेक महत्वाचे निर्णय
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात कॅसिनो कायदा रद्द करण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाने कॅसिनो कायदा रद्द केला आहे. यासोबत गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा पुरवण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकाला एक किलो रवा, चणा डाळ, साखर, खाद्यतेल असा […]
सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची न्यायालयात धाव, ‘न्याय: द जस्टिस’ चित्रपटाचे प्रसारण थांबवण्याची मागणी
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या जीवनावर आधारित ‘न्याय: द जस्टिस’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस बजावली. सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी OTT प्लॅफॉर्म्सवर चित्रपटाचे प्रसारण थांबवण्याची विनंती करणारी याचिका दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली. उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशाने चित्रपटाच्या स्ट्रीमिंगवर स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर कृष्ण किशोर सिंह यांनी […]
तरुणाकडून लिव्ह-इन पार्टनरची गोळ्या झाडून हत्या
उत्तर प्रदेश : एका तरुणाने लिव्ह-इन पार्टनरची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीच्या डोक्यात आणि छातीवर गोळी झाडली, असे पोलिसांनी शुक्रवारी (18 ऑगस्ट) सांगितले. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये ही घटना घडली. ऋषभ सिंग भदौरिया असे या आरोपीचे नाव असून पीडितेचे नाव रिया आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला विधवा होती जी पतीच्या […]
इंडिगो विमानाच्या पायलटचा बोर्डिंग गेटवरच मृत्यू, नागपूर-पुणे उड्डाणापूर्वी घडली घटना
नागपूर : गुरुवारी नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या उड्डाणाच्या काही वेळापूर्वी विमानाचा पायलट अचानक बेशुद्ध होऊन बोर्डिंग गेटवर पडला. त्यानंतर रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. कॅप्टन मनोज सुब्रमण्यम (वय ४०) असे मृत वैमानिकाचे नाव आहे. दोन दिवसांत भारतातील वैमानिकाच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. यासंदर्भात इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘नागपूरमध्ये आमच्या एका वैमानिकाच्या […]
नांदेड हादरलं! हसण्याच्या कारणावरुन फळ विक्रेत्याने छाटले तरुणाचे दोन्ही हात
नांदेड : हसण्याच्या कारणावरुन एका फळ विक्रेत्याने तरुणाचे दोन्ही हात छाटल्याची भयंकर घटना समोर आली आहे. नांदेडच्या भाग्यनगर परिसरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असं पीडित तरुणाचं नाव असून मोहम्मद तोहीद हा आरोपी फरार आहे. शहरातील डी मार्ट परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद […]
लम्पी निवारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर : एक रुपयात शेतकऱ्यांना विमा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे, ही अभिमानाची बाब आहे. पशुधनासाठी शासनाने आतापर्यंत १७० कोटी रूपये खर्च केले आहेत. लम्पी निवारणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लम्पी आजारासाठी लागणाऱ्या मदतीसाठी शासन सदैव शेतकऱ्यांशी पाठीशी आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती व हर घर जल या योजनेत अहमदनगर जिल्हा आघाडीवर […]










