नवी दिल्ली : केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल प्रकाशित केला असून, खोदलेल्या विहिरी, भूपृष्ठावरील जल आणि उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे, तर देशात लघुसिंचन योजनांमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही नमूद आहे. देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक लघु जलसिंचन योजना आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ई-केवायसी केलेल्या ३ लाख शेतकऱ्यांकरिता २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी वितरित – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
मुंबई : ई – केवायसी केलेल्या राज्यातील 3 लाख शेतकऱ्यांकरिता मदतीचा 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. मंत्री पाटील यांनी संगणकीय प्रणालीवर कळ दाबून निधी वितरणाची प्रक्रिया सुरु केली. गेल्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता शासनाने […]
सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ
मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. विविध सांस्कृतिक पुरस्कारांच्या निवड समित्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, तेव्हा त्यांनी ही घोषणा केली. सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध जीवन गौरव पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने, तर […]
ॲमस्टरडॅमच्या अभ्यासभेटीत विधिमंडळ सदस्यांनी जाणून घेतली तंत्रज्ञानाची माहिती
ॲमस्टरडॅम /मुंबई : दुग्ध उत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञानात नेदरलँड्सने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. कोविड काळानंतर भारत आणि नेदरलँड्सने परस्परांमधील व्यापार व उद्योगवाढीच्या दिशेने नवी भरारी घेतली आहे. भारतातील नवउद्यमशील तसेच प्रज्ञावंत नेदरलॅंड्समध्ये उल्लेखनीय योगदान देत आहेत. हे संबंध आणखी दृढ होत जावेत आणि भारताने प्रगतीचा आणखी पुढील टप्पा गाठावा, अशी प्रतिक्रिया विधान […]
राज्यात लवकरच हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविणार
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राज्यात मागील तीन-चार महिन्यापासून हातभट्टी विरोधी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमुळे इतर मद्याच्या विक्रीत चांगली वाढ झालेली आहे. तरी राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविण्याबाबत शासन स्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून या अभियानात सहभागी होणाऱ्या गावांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन […]
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिला उमदी घटनेतील विद्यार्थ्यांना धीर
सांगली : उमदी गावामध्ये असलेल्या समता अनुदानित आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना काल (27 ऑगस्ट) रात्री जेवणानंतर अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे दिसून आल्यानंतर या विद्यार्थ्यांना जत, माडग्याळ, कवठेमहांकाळ व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले. याची दखल घेत गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज ग्रामीण रूग्णालय जत येथे भेट देवून […]
पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि नागरिकांच्या हाताला काम या त्रिसूत्रीचे कालबद्ध नियोजन करावे – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक : जिल्ह्यात अनेक तालुक्यांत कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि नागरिकांच्या हाताला काम या त्रिसूत्रीचे कालबद्ध नियोजन करण्यात यावे. अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री दादाजी भुसे […]
राज्यात फुटबॉल खेळाच्या विकासासाठी जर्मनीतील ‘बुंदेसलिगा’ लीग सोबत महत्त्वाचा सामंजस्य करार
पुणे : राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि जर्मनी येथील ‘बुंदेसलिगा’ या सर्वात मोठ्या व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्राच्यावतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल आणि क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे, तर बुंदेसलिगाचे प्रतिनिधी श्रीमती […]
ठाणे : खांबावर आदळल्यानंतर मोटारसायकलने घेतला पेट, 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
ठाणे : मोटारसायकल खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर आज पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मोटारसायकलस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती खांबाला आदळली आणि दुचाकीने पेट घेतला. मीरा रोड भागातील ही व्यक्ती आपल्या मोटारसायकलवरून घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने जात असताना मेट्रो मार्गाच्या एका खांबावर आदळून हा […]
नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी! जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण
बुडापेस्ट : ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, बुडापेस्ट येथे पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत 88.17 मीटरच्या मोठ्या थ्रोसह देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने पाकिस्तानच्या कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन अर्शद नदीमला पराभूत केले, ज्याने त्याच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट 87.82 मीटर थ्रोसह रौप्य आणि चेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेज याने 86.67 मीटर थ्रोसह कांस्यपदक मिळवले. 25 वर्षीय […]










