मुंबई : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची आज बैठक झाली. या बैठकीत श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकासाच्या २८६.६८ कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास तसेच श्री क्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राच्या सुधारित १६३ कोटी आणि श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या ८१.८६ कोटीच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. तीर्थक्षेत्री […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
रुग्णांना तत्काळ उपचारसेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती : रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येकाला तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी चोवीस तास सतर्क राहून आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधा, औषधी व उपकरणांची तजवीज करुन ठेवावी. औषधे व उपचाराअभावी कोणालाही जीवाला मुकावे लागणार नाही, यासाठी आरोग्य यंत्रणेने जबाबदारीपूर्वक काम करावे. आरोग्य सेवा-सुविधांबाबत नियमितता राहण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका प्रशासन आदींनी आरोग्य केंद्र, रुग्णालयांना […]
अखेर तिढा सुटला! औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशानंतर प्रमोद बोंद्रे यांचे सरपंचपद कायम
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेच्या अशा शिबलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद बोंद्रे यांचे सरपंचपद जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर ठरवले होते. याबाबत प्रमोद बोंद्रे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला असून, प्रमोद बोंद्रे यांचे सरपंचपद कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिबलापुर ग्रामपंचायतीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाची सत्ता होती. ठरल्याप्रमाणे अडीच […]
आरोग्यावरील खर्च दुप्पट व गुंतवणूक वाढविणार, आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी ‘व्हिजन २०३५’
मुंबई : राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने आज राज्य शासनाने मोठे पाऊल टाकले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारणे तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी युद्धपातळीवर पाऊले टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. येत्या १५ दिवसांत सचिवांच्या समितीने नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या जोडीने […]
भारत-युगांडातील परस्परसंबंध दृढ व्हावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : भारत आणि युगांडा दरम्यान थेट हवाई संपर्कामुळे व्यवसाय, व्यापार, संस्कृती, पर्यटन, आरोग्य सेवांचा विस्तार होणार आहे. अशा पाऊलामुळेच दोन्ही देशांतील परस्पर संबंध दृढ होणार असून समृद्धी, शांतता व चांगल्या भविष्यासाठी सहकार्य मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. युगांडा प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय दिन आणि मुंबई-एंटेबे थेट उड्डाणाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. […]
पुणे : अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना मोठे स्फोट होऊन भीषण आग, चार स्कूल बस जळून खाक
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ एका गॅस टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीनंतर मोठे स्फोट होऊन हवेत आगीचे लोट पसरू लागल्याने लोकांची पळापळ सुरू झाली. आगीत तीन ते चार स्कूल बस जळून खाक झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या विभागाने पुष्टी केली आहे की ताथवडेमध्ये अनधिकृतपणे प्रोपीलीन गॅसचे रिफिलिंग हे […]
राज्यात किमान ५ मोठ्या शासकीय रुग्णालयांत लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सुरू करणार
कोल्हापूर : शासकीय रुग्णालयात मोठमोठ्या शस्त्रक्रियेची सुविधा व प्रत्यारोपण व्यवस्था नाही. गोरगरिबांसाठी राज्यातील 27 पैकी महत्त्वाच्या 5 ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात येत्या तीन ते चार महिन्यात लिव्हर व किडनी प्रत्यारोपण सुविधा सुरू करणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अत्याळ, कोल्हापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी सांगितले. नांदेडसारख्या दुर्दैवी […]
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल – सुधीर मुनगंटीवार
जपान : ‘इंडिया मेला’च्या निमित्ताने भारत आणि जपान या दोन्ही देशांमधील सौहार्द, मैत्रीभाव घट्ट होऊन एकत्रीतपणे प्रगतीची नवी शिखरे सर करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत आणि जपानमधील ही मैत्री अधिक दृढ होईल, अशा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जपान येथील कोबे शहरात भारत-जपान यांच्यातील […]
शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी वर्गातील लोकांना करातून काहीसा दिलासा, ‘या’ सेवांना जीएसटी करातून सूट
नवी दिल्ली : शेतकरी, विद्यार्थी, व्यापार व उद्योग क्षेत्रातील लोकांना 52व्या जीएसटी परिषदेत करातून काही दिलासा मिळाला असून केंद्र शासनाने या वर्गांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतल्याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी समाधान व्यक्त केले. वित्त मंत्रालयाच्यावतीने वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५२ वी बैठक येथील सुषमा स्वराज भवनात आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्थमंत्री निर्मला […]
तरुणांनी कौशल्य विकसित करीत स्वयंरोजगाराला प्राधान्य द्यावे – मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : देशातील तरुणांनी स्वत:मधील कौशल्य विकसित करावे. तसेच स्वयंरोजगार करताना अन्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येथे केले. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह सोसायटी व अर्थ स्कूल ऑफ इंटरप्रीनरशीप यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायंकाळी महाराष्ट्र […]










