मुंबई : समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही किंवा त्यांची शैक्षणिक, आर्थिक शिस्त यात कोणताही बदल होणार नाही. समूह विद्यापीठात सहभागी होण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले. सिडनहँम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित समूह विद्यापीठ स्थापनेसंदर्भात उच्च व […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
महापरिनिर्वाण दिनासाठी अनुयायांच्या सोयी-सुविधांचे काटेकोर नियोजन करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : ‘महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे,’ असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. […]
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री […]
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली. हिवाळी अधिवेशन गुरुवार दि ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ या कालावधीत घेणार आहे. […]
मुंबई पोलिसांसह त्यांच्या कुटुंबासाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग
मुंबई : मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता ‘प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजने’च्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे येत्या १ डिसेंबर रोजी ताडदेव येथे सकाळी १०.३० आणि वरळी येथे सकाळी ११.३० वाजता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]
पुणे : नऱ्हे येथील ऑटो गॅरेजमधील आगीत अनेक गाड्या जळून खाक
पुणे : पुण्यातील नऱ्हे येथील अंबामाता मंदिराजवळील “परफेक्ट ऑटो गॅरेज” येथे 4 चारचाकी आणि 6 दुचाकी अशा एकूण दहा वाहनांना आग लागली. दरम्यान, अग्निशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. पाच ते सात गाड्यांच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटलेल्या आढळल्या आहेत. त्यामुळे, आगीचे कारण आणि तोडफोडीचा देखील पोलीस तपास करत आहेत.
ठाणे शहरातील एका विहिरीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
ठाणे : ठाणे शहरातील एका विहिरीत बुधवारी सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या प्रकरणाचा अजून तपास सुरू आहे. अहवालानुसार, ठाणे महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितले की, कापूरबावडी परिसरातील शिवमंदिर परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह दिसल्याची माहिती त्यांना पहाटे ४:५७ वाजता मिळाली. घटनेची माहिती […]
पुणे : भारत गौरव एक्स्प्रेसमधील 40 हून अधिक प्रवाशांना अन्नातून विषबाधा
पुणे : भारत गौरव एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 06911) मधील सुमारे 40 प्रवाशांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीची लक्षणे आढळल्याने आरोग्यविषयक आणीबाणी समोर आली. ही घटना चेन्नई (MAS) ते पालिताना (PLT) 19 LHB कंपोझिशन ट्रेनच्या प्रवासादरम्यान घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांनी त्यांच्या खासगी कंत्राटदारामार्फत जेवण घेतले होते. रेल्वे कर्मचारी किंवा आयआरसीटीसी कर्मचार्यांनी खाद्यपदार्थांचा पुरवठा केला नाही. मिळालेल्या […]
बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वसमावेशक असे ‘बालधोरण’ महिला व बालविकास विभाग तयार करीत आहे. जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्यासाठी विभागाने बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या. मंत्रालयातील दालनात बालधोरण मसुद्याच्या सादरीकरणावेळी सूचना करताना मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास […]
तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, तीर्थक्षेत्र […]










