रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा बहुप्रतीक्षित तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याविरुद्ध नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. एकीकडे शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण भैय्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
नवी मुंबईत नवभारत इंडस्ट्रियल कंपनीला आग, अग्निशमक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे व्हिडिओ समोर आले आहेत. आग इतकी भीषण आहे की, परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू […]
IPL डबल हेडर : आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये पहिला सामना, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुसरा सामना
IPL डबल हेडर : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील पहिला डबल हेडर आज खेळवला जाणार आहे. दिवसाच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी मोहाली येथे दुपारी 3.30 वाजता होणार आहे. या सामन्याचा नाणेफेक महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी ३.०० वाजता होणार आहे. पंजाब किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी मोहालीतील नवीन […]
प्रत्येक मतदाराने मतदान केल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
नागपूर : सशक्त लोकशाहीमध्ये मतदानाचे पावित्र्य ठेवून प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यावश्यक आहे. याच्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही. नागपूर लोकसभेसाठी मागच्या वेळेस अवघे 54 टक्के मतदान झाले होते हे विसरता कामा नये. याचाच अर्थ 46 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याचे पालन केले नाही. यावेळेस हे चित्र बदलविण्यासाठी सर्व मतदार राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदानाचे प्रमाण 75 […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ एप्रिल व १९ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २८ एप्रिल, २०२४ रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, १९ मे, २०२४ रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम, […]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न, ७१ व्यक्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित
पुणे – स्वप्नल फाऊंडेशनच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे ‘राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२४’ आयोजित करण्यात आला होता. यासाठी डॉ.राजाराम धोंडकर – पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक, डॉ. रजनी इंदुलकर – मा.लोकमान्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका, मा.रवींद्र कुलकर्णी – निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे, मा. सुनील हुरेरकर – स्वीय सहाय्यक पोलीस आयुक्त पिपरी चिंचवड […]
आरोग्याच्या सुविधा चांगल्या व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग सक्षम – आरोग्य मंत्री तानाजी सावंत
सोलापूर दि.13(जिमाका): – सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यास शासनाने प्राधान्य दिले आहे. आरोग्य सुविधांसाठी आवश्यक तो निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असून, नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा तात्काळ व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याचे प्रतिपादन आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केले. महिला व नवजात शिशू रूग्णालय आणि जिल्हा रूग्णालय […]
शासकीय यंत्रणांच्या सक्षमीकरण आणि बळकटीकरणावर भर – पालकमंत्री उदय सामंत
रायगड(जिमाका)दि.१३ : रायगड जिल्हा प्रशासन गतीमान करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या माध्यमातून सर्व शासकीय यंत्रणांचे सक्षमीकरण आणि बळकटीकरणावर भर देण्यात येणार असल्याचे, प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीतून […]
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र ही संत, कर्तृत्ववानांची भूमी आहे. या भूमीतूनच देशाला अनेक परंपरा आणि सुधारणा देण्याचे काम झाले आहे. राज्य शासनही हाच धागा पकडून महामानवांच्या विचारांनुसार काम करीत आहे. आपले राज्य पायाभूत सोयी सुविधा उभारणी, परकीय गुंतवणूक यामध्ये देशात अव्वल असून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रेसर आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढत […]
रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
जालना, दि. १२ (जिमाका): नवनवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज ८५ हजार कोटींहून अधिकच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. जालना जिल्हा तसेच संपूर्ण मराठवाड्यातील उत्पादीत शेतीमाल व इतर वस्तुंच्या निर्यातीसाठी […]










