Remedesivir injection - Dr. Sujay Vikhe
अहिल्यानगर कोरोना महाराष्ट्र राजकारण

‘तो’ व्हिडिओ पाहिला तर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, कोणत्याही कारवाईला घाबरत नाही – खासदार सुजय विखे

नगर : खासदार सुजय विखे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मुद्यावर आपले मत स्पष्ट शब्दांत मांडले आहे.  आपल्याकडे सर्व कागदपत्रे आहेत असून कोणत्याही कारवाईला आपण घाबरत नाही. इंजेक्शनमुळे ज्यांचे जीव वाचले, ते लोक माझ्या पाठिशी आहेत. ती इंजेक्शन संपली आहेत. इंजेक्शनचे रिकामे बॉक्स आता शिल्लक आहेत. त्यामुळे जप्त काय करणार? माझा तो व्हिडिओ नीट पाहिला तर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील,’ असे म्हणत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वादाला उत्तर दिले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

खासदार सुजय विखे यांनी दिल्ली येथून विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणला होता. त्याचा व्हिडिओ बनवून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. परंतु त्यावरून अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले, तसेच यासंबंधी उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते नगरमध्ये आढावा बैठकीसाठी आले तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले कि, “गरजू रुग्णांना मदत करण्यात काही गैर नाही. यात आम्हाला कोणते राजकारण करायचे नाही किंवा व्यवसाय करायचा नाही. अडचणीच्या काळात विखे कुटुंबांची लोकांसोबत राहण्याची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही कितीही पक्ष बदलले तरी लोक पन्नास वर्षांपासून आमच्यासोबत आहेत. आम्ही काही चुकीचे करणार नाही, यावर लोकांचा विश्वास आहे. यावेळीही आम्ही काही चुकीचे केले नाही. त्या इंजेक्शनची खरेदी आणि वाटपाची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. आणलेला साठा संपल्याचे आपण त्या व्हिडिओमध्येच जाहीर केले आहे. त्यामुळे आता कारवाई काय करणार आणि जप्त काय करणार? इंजेक्शनचे रिकामे बॉक्स आता शिल्लक आहेत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला आणि राजकारणाला आम्ही घाबरत नाही. आपण नेमकी किती इंजेक्शन आणली याचा आकडा त्या व्हिडिओमध्ये जाहीर केलेला नाही. हा दहा हजारांचा आकडा कोठून आला माहिती नाही. यासंबंधी बाहेरच्या कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. जिल्ह्यातील लोकनियुक्त लोकप्रतिनिधींनी जर आपल्याला विचारले तर त्यांना आपण नक्की उत्तर देऊ. इतरांनी यासंबंधी बोलू नये. न्यायालयात याचिका दाखल झाली असली तरी चिंता नाही. कारण आमच्याकडे सरकारी कागदपत्रांचा पुरावा आहे. आणलेली इंजेक्शन कोणाला दिली याच्या नोंदी आहेत. यामध्ये कोणताही काळाबाजार अगर गैरकृत्य झाले नाही, त्यामुळे कायदेशीर कारवाईलाही घाबरण्याचे कारण नाही.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत