Amravati RFO Deepali Chavan commits suicide
अमरावती महाराष्ट्र

‘लेडी सिंघम’ अशी ओळख असणाऱ्या RFO दिपाली चव्हाण यांची आत्महत्या, सुसाईड नोटमधून समोर आलं कारण..

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या वन परीश्रेत्रात कार्यरत RFO दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे. या २८ वर्षीय तरूण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मूळच्या सातारच्या असणाऱ्या दिपाली चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वन सेवा 2014 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी हरिसाल वन परिक्षेत्राची धुरा सांभाळली. हरिसाल येथे रोरा, मांग्या व मालूर या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली होती. त्यांच्या कामाची सर्वत्र चर्चा होती. डिंक तस्कर रेल्वेत पळून गेल्यावर त्यांनी दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडले होते. त्यातून त्यांची ओळख “लेडी सिंघम” अशी झाली होती.

असे असूनही अतिशय कर्तव्यनिष्ठ असलेल्या दीपाली यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मुस्कटदाबी केली जात होती. गर्भवती असताना त्या मालूर येथे कच्च्या रस्त्यातून पायी फिरत होत्या. सुट्टी दिली जात नव्हती. पगार रोखून धरला जात होता. या सर्व गोष्टी त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्या आहेत.

दरम्यान, सुसाईड नोटमध्ये दीपाली यांनी ज्या अधिकाऱ्यावर आरोप केले आहेत, ते उपवनसंरक्षक शिवकुमार यांना आज नागपूर येथून अटक करण्यात आली. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी नॉट रीचेबल असल्याची माहिती मिळत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत