centre writes to states to increase the interval between two doses of covishield vaccine
देश

बिग ब्रेकिंग : केंद्राकडून महत्वाच्या सूचना, कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवा

नवी दिल्ली : भारतात पुन्हा कोरोना व्हायरसच्या संसर्गामध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने कोविशील्ड संदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. केंद्राने राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारांना कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यास सांगितले आहे. एनटीजीआय आणि एनईजीव्हीएसीच्या शिफारशीनुसार या दोन डोसमधील अंतर 6-8 आठवडे करण्यास सांगितले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप आणि लस प्रशासनावरील नॅशनल एक्सपर्ट ग्रुपच्या सूचनेनंतर हे पत्र राज्यांना लिहिले गेले आहे. दुसरा डोस कोणत्याही परिस्थितीत 8 व्या आठवड्यात देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ही सूचना केवळ कोविशील्डवर लागू होणार आहे. सध्या भारतभर कोविशील्ड लसीचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जात आहेत. नवीन शिफारसींमध्ये असे म्हटले आहे की कोविशील्ड चा दुसरा डोस सद्य 28 दिवसांच्या अंतरांऐवजी 6-8 आठवड्यांनंतर दिला तर रोग प्रतिकारशक्ती आणखी वाढू शकते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत