Husband brutally murdered after showing pornographic videos
नागपूर महाराष्ट्र

भयंकर : अश्लील चित्रफीत दाखवून बेसावध करत पतीची निर्घृण हत्या, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

नागपूर : नागपूरमध्ये एका महिलेने तिच्या नवऱ्याचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेने तिच्या नवऱ्याला अश्लील चित्रफीत दाखवून त्याचे हात खुर्चीला बांधले आणि नंतर त्याच्या गळ्यावरून चाकू फिरवत त्याचा खून केला. लक्ष्मण मलिक (वय ६५) यांच्या हत्येचा उलगडा करीत गुन्हेशाखा पोलिसांनी याप्रकरणी मारेकरी पत्नीला अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

स्वाती लक्ष्मण मलिक (वय ३१) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. स्वातीचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिने लक्ष्मण यांच्यासोबत लग्न केले. लक्ष्मण यांची ती पाचवी पत्नी होती. लक्ष्मण यांच्यापासून तिला आठ वर्षांचा मुलगा देखील आहे. परंतु, दोन वर्षांपासून ते दोघे वेगळे राहत होते. त्यानंतर काही महिन्यांपासून या महिलेचे अमित नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून तिला तीन महिन्यांचा लहान मुलगा असल्याचे लक्ष्मण यांना कळले.

लक्ष्मण यांनी याबाबत स्वातीकडे विचारणा केली. तेव्हा तिने मुलगा दत्तक घेतल्याचे लक्ष्मण यांना सांगितले. मात्र, स्वातीचे एका स्कूल बस चालकासोबत अनैतिक संबंध असल्याचे लक्ष्मण यांना समजले होते. त्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. लक्ष्मण यांनी स्वातीकडे त्यांचा आठ वर्षांचा मुलगा व त्यांचे पेन्शन खात्याचे एटीएम कार्ड परत मागितले. परंतु, लक्ष्मण यांना मुलगा व एटीएम कार्ड द्यायला स्वाती तयार नव्हती.

सोमवारी दुपारी स्वातीने लक्ष्मण यांच्या मोबाइलवर संपर्क साधून घरी येत असल्याचे सांगितले. त्यादिवशी त्यांच्या आठवर्षीय मुलाचा वाढदिवस असल्याने स्वाती मुलाला घेऊन येत असल्याचा लक्ष्मण यांचा समज झाला. कॅबने ती गणेशपेठ बसस्थानक परिसरात आली. रजत संकुलमधील लक्ष्मण राहात असलेल्या फ्लॅटमध्ये गेली. स्वाती एकटीच फ्लॅटमध्ये आल्याने त्यांनी मुलाबाबत विचारणा केली. त्यावर तो आला नसल्याचे तिने पतीला सांगितले. नंतर तिने अश्लील चित्रफीत दाखवून लक्ष्मण यांना उत्तेजित केले. नंतर त्यांना खुर्चीवर बसवून दोरीने त्यांचे दोन्ही हात बांधले आणि संधी साधून चाकूने गळा चिरून त्यांची हत्या केली.

हत्येनंतर स्वाती ऑटोने गोकुळपेठ येथे परतली. तिने मोबाइल ‘स्विच्ड ऑफ’ केला. मंगळवारी सकाळी लक्ष्मण यांचा मृतदेह आढळला. गणेशपेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास सुरू केला. तपासादरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या. स्वातीने सोमवारी दुपारी लक्ष्मण यांच्या मोबाइलवर संपर्क साधला होता. याशिवाय तिला दुपारी कॅबचालकाचा फोन आल्याचेही निष्पन्न झाले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. परंतु, पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता लक्ष्मण यांची हत्या केल्याचे तिने मान्य केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत