मुंबई : मुंबईत कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने अतिशय कठोर नियम तयार केले आहेत. नव्या नियमांनुसार, होम क्वारंटाईन असलेली व्यक्ती जर बाहेर गेली तर आता थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
तसेच ५ पेक्षा जास्त जणांना संसर्ग झाल्यास कोरोना रूग्ण असलेल्या फ्लॅटला याची माहिती नोटीस बोर्डावर द्यावी लागेल. जे होम क्वारंटाईन आहेत त्यांनी जर नियमांकडे दुर्लक्ष केलं किंवा ते घरात न आढळल्यास त्यांना संस्थागत स्वरूपात विलगीकरणात ठेवण्यात येतील. कोरोना विषाणूच्या संसर्गाची 90 टक्के प्रकरणे उंच इमारती आणि बिल्डिंगमधून येत आहेत, असं देखील बीएमसीने सांगितलं आहे.




