selling an eight month old girl 4 arrested incident in virar
महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक : आईचं निधन, वडील सोडून गेले, 8 महिन्याच्या निरागस चिमुरडीची विक्री… पोलिसांकडून टोळीचा भांडाफोड..

विरार : आईचं निधन, वडील सोडून गेले, निरागस चिमुरडीची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार विरार पोलिसांनी सापळा रचुन मुलीची सुखरूप सुटका केली आहे व आरोपींना बेडया ठोकल्या. मुलीला बालसंगोपान केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळाली माहिती अशी कि, कोरोना काळात चिमुरडीच्या आईचं निधन झालं होतं. तर वडील सोडून गेले होते. आईच्या निधनानंतर चिमुरडी आपल्या नातेवाईकांकडे राहत होती.  त्या 8 महिन्याच्या या निरागस चिमुरडीची आर्थिक फायद्याकरीता 2 लाखात विक्री करण्यात येणार होती. मात्र त्याआधीच विरार पोलिसांना याचा सुगावा लागला. ज्या ठिकाणी चिमुरडीची विक्री होणार होती तेथे विरार पोलिसांनी सापळा रचला आणि 4 आरोपींना बेडया ठोकल्या. यात दोन महिला तर दोन पुरुष आहेत. विषेश म्हणजे पिपला उर्फ बिपीन उर्फ डॉक्टर जितेन हा डॉक्टर सुध्दा या कटात सामील होता.

आरोपी चौघांनाही वसई न्यायालयानं 16 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या मुलीला बालसंगोपान केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. या कटात नातेवाईक ही सामील आहेत का? याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत