Delhi Police announces rewards on 8 accused including Deep Sidhu
देश

लाल किल्ला हिंसाचार प्रकरण : दीप सिद्धूसह 8 आरोपींवर दिल्ली पोलिसांकडून बक्षिसांची घोषणा

२६ जानेवारीला झालेल्या लाल किल्ल्यातील हिंसाचारप्रकरणी दीप सिद्धू, जुगराज सिंह, गुरजंत सिंह, गुरजोत सिंह, जगबीर सिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंह यांना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी सिंघू, टीकरी आणि गाझीपूर सीमेवर तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, ट्रॅक्टर आणि मोटारसायकलवर स्वार असलेल्या सुमारे 300 जणांनी लाल किल्ल्याच्या आत उत्पात मांडला होता आणि भीषण परिस्थिती निर्माण केली होती. यामध्ये बरेच पोलिस देखील जखमी झाले होते.

दिल्ली पोलिसांनी आता 26 जानेवारीच्या हिंसाचारात सहभागी असलेल्या दीप सिद्धू, जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंग यांना अटक करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये आणि जगबीर सिंग, बूटासिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांना अटक करण्यासाठी प्रत्येकी 5०,००० रुपये रोख पुरस्कार जाहीर केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत