सांगली : सांगली शहराजवळील कर्नाळ रोड येथील हॉटेल रणवीरमध्ये सुरु असलेले हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्याच्या एका पोलिस निरीक्षकासह हॉटेल मालक, एजंट आणि इतर 3 जणांना अटक करण्यात आली. तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर, हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दोन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षकाला अटक झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक (पिटा) कायद्यानुसार हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.




