सौरव गांगुली यांची प्रकृती उत्तम असून ते थोडं अस्वस्थ वाटल्यामुळे चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, असं कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलने स्पष्ट केलं आहे.
सौरव गांगुली त्यांच्या ह्रदयाची स्थिती तपासण्यासाठी आले आहेत. मागच्या वेळी रुग्णालयात असल्यापासून त्यांच्या पॅरामीटर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि त्यांचे महत्त्वपूर्ण पॅरामीटर्स स्थिर आहेत, अशी माहिती अपोलो हॉस्पिटलने दिली आहे.




