Supreme Court stays Nagpur bench's controversial verdict in sexual harassment case
महाराष्ट्र मुंबई

लैंगिक शोषण प्रकरणात नागपूर खंडपीठाच्या ‘त्या’ वादग्रस्त निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीच्या अंगावरील कपडे न काढता तिच्या मर्जीशिवाय शरीराला हात लावण्याची क्रिया म्हणजे लैंगिक शोषण नव्हे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या या वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नागपूर खंडपीठाच्या निकालामुळे धोकादायक उदाहरण प्रस्थापित होईल, असं अॅटर्नी जनरल यांनी आपल्या निवेदनात म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या वादग्रस्त निर्णयाला स्थगिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

12 वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात दोषी ठरवलेल्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली होती. याप्रकरणी सुनावणी करताना कोर्टाने म्हटलं होतं की, “अल्पवयीन मुलीच्या मर्जीविना तिच्या अंगावरचे कपडे न काढता तिच्या शरीराला हात लावला असेल तर याला लैंगिक शोषण म्हणायचं का? हा गुन्हा विनयभंगाचा आहे की पॉक्सो कायद्याअंतर्गत येणाऱ्या लैंगिक शोषणाचा? “हा गुन्हा लैंगिक शोषणाचा नाही,” असं हायकोर्टाने म्हटलं आणि कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा कमी करुन एका वर्षाची केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. हा निर्णय म्हणजे संकुचित दृष्टीकोन असल्याचं कायदेतज्ज्ञांनी म्हटलं होतं. यानंतर अॅटर्नी जनरल यांनीही हायकोर्टाचा निर्णयामुळे चुकीचं उदाहरण प्रस्थापित होईल, असं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. यावर सुनावणी करताना सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अॅटर्नी जनरल यांना नागपूर खंडपीठाच्या आदेशाविरुद्ध योग्य याचिका दाखल करण्याची परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या पॉक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत आरोपीला निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयावर स्थगिती दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत