Deputy Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र

कुणी काय लपवाछपवी केली, कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हतं, हे सांगू का? अजित पवारांनी दिला इशारा

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आले आहेत, असं असलं तरीही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं आहे. मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केली, मला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, सांगू का?, असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले कि, धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही त्यावरून विरोधक टीका करत आहेत. आधी विरोधकांनी मुंडेंवर आरोप केले. नंतर तोंडघशी पडल्यावर आता वेगळा आरोप केला आहे. विरोधकांचं टीका करणं हे काम आहे. पण ती कोणत्या पातळीपर्यंत असावी याला मर्यादा आहेत. तसेच मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केली सांगू का? असा इशारा त्यांनी दिला. कुणाला किती मुलं होती. कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हतं, हे सांगू का? अशा बऱ्याच गोष्टी मला माहीत आहे, सांगायलाच हव्या का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत