एका महिलेने एक पोर्टलवर आपले सासू-सासरे नाराज झाल्याचे कारण सांगितले आहे. हे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या महिलेने लिहिले आहे कि, माझे सासू-सासरे खूप चांगले आहेत, परंतु सोशल मीडियावरील त्यांचा माझ्याबद्दल दृष्टीकोन खूप विचित्र होता.
महिलेने लिहिले की, ‘माझे सासू-सासरे फेसबुकवर माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये होते आणि ते माझ्या प्रत्येक पोस्टवर कमेंट करत असायचे. मी माझ्या मुलाचा फोटो टाकला तर ते माझे खूप कौतुक करायचे. पण जर मी माझ्या मित्र-मैत्रिणीबरोबर माझा फोटो पोस्ट केला तर ते मला लाजिरवाण्या कमेंट करायचे. ‘
महिलेने पुढे लिहिले की, ‘मी अजून 40 वर्षांचीही नाही आणि वयाच्या 68 व्या वर्षापर्यंत मला जे पाहिजे ते परिधान करू शकते, परंतु माझ्या सासरच्यांनी माझ्या फोटोवर नेहमीच विचित्र कमेंट्स केल्या. माझ्या एका फोटोवर माझ्या सासर्याने लिहिले की मला आशा आहे की या परिस्थितीत तुझी मुले तुला पाहत नसतील. त्यांचे म्हणणे होते की मी त्या फोटोत नशेत होते.
तिच्या पोस्टवर तिच्या सासू-सासऱ्यांच्या नेहमीच्या विचित्र कमेंट्स मुळे त्रासलेल्या महिलेने सासू-सासऱ्यांना फेसबुकवर अनफ्रेंड केले. यामुळे त्या दोघांना या महिलेचा प्रचंड राग आला. महिलेने लिहिले की, ‘माझ्या सासूने मला मेसेज केला की मी तिला अनफ्रेंड का केले?’ मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की त्यांच्या काही कमेंट्स मला खूप आक्षेपार्ह वाटल्या आणि मला माझे सोशल मीडिया खाते माझ्या काही मित्रांपुरते मर्यादित ठेवायचे आहे. सासूने माझ्या सासऱ्यांना हे सांगितले आणि तेव्हापासून दोघांनीही माझ्याशी बोलणे बंद केले.
महिलेने पुढे लिहिले कि, माझ्या पतीने आपल्या आईवडिलांना माझी बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि म्हटले की अनफ्रेंड करण्याबद्दल ते काहीही म्हणू शकत नाही, कारण सहसा माझ्या वयाच्या स्त्रियांच्या सोशल मीडिया फ्रेंड्स मध्ये सासू-सासरे नसतात. मी केवळ विनम्रता दाखवत त्यांना ऍड केलं होतं.
महिलेने लिहिले की, ‘ही माणसे बालिशपणे वागतात. मी आधीसुद्धा बर्याच लोकांना अनफ्रेंड केले आहे आणि मला याचा फरक पडत नाही. या लोकांच्या कृती खूप विचित्र आहेत. ते आता माझ्या घरीसुद्धा येत नाहीत. माझा नवरा मुलांना घेऊन त्यांच्याकडे जातो, पण मला बोलावले जात नाही. पण मला याने फरक पडत नाही आणि हे अतिशय हास्यास्पद आहे.
महिला म्हणते कि, आता माझे सासू-सासरे तेव्हाच सामान्य वागतील जेव्हा मी त्यांना पुन्हा माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये ऍड करीन, परंतु मी हे का करावे? त्या महिलेने लिहिले की, ‘मला वाटते की वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी आरोग्याबद्दल चिंता करावी, त्यांच्या सूनच्या सोशल मीडिया पेजबद्दल नाही.’
‘माझ्या मुलाने एक दिवस मला विचारले की त्याचे आजी-आजोबा माझ्याशी का बोलत नाहीत? प्रथम मी विचार केला की मी त्याला दुसरे काही कारण सांगावे, मग मला वाटले की त्याला सत्य सांगितले पाहिजे. मी त्याला सांगितले की त्याचे आजी-आजोबा दुःखी आहेत, कारण त्यांना आता माझ्या फेसबुक पोस्ट बघता येत नाहीत. माझा 10 वर्षाचा मुलगा म्हणाला की ही एक अतिशय विचित्र गोष्ट आहे.
महिलेने लिहिले की, ‘मला आशा आहे की त्यांनी अशा प्रकारचा बालिशपणा सोडून ही गोष्ट इथेच संपवावी. मला वाटते की मलाच पुढे येऊन या प्रकरणाचे निराकरण करावे लागेल. मी त्यांना फेसबुकवर तर ऍड करणार नाही, परंतु फोनवर बोलून मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन.
महिलेने शेवटी लिहिले, ‘मला वाटत आहे की मी त्यांना माझ्या दुसर्या फेसबुक अकाऊंटच्या फ्रेंड लिस्टमध्ये ऍड करावं, कारण मी ते अकाऊंट क्वचितच वापरते आणि कदाचित यामुळे ते पुन्हा एकदा आनंदी होतील. माझी फक्त अशी इच्छा आहे की त्यांनी अशा प्रकारचा बालिशपणा करणे थांबवावे.




