Rape of a minor girl in Panvel
महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक : गुरे चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पालघर: मनोर येथील गुरे चारण्यासाठी गेलेल्या १६ वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीसह कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील मनोरमध्ये २१ ऑक्टोबरला ही घटना घडली. पीडित मुलगी गुरे चारायला शेतावर गेली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला फरफटत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात कलम ३७६ आणि पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत