विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत हि माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस ट्विट मध्ये म्हणाले कि, लॉकडाऊन झाल्यापासून मी दररोज काम करत आहे परंतु आता असे दिसते की मी थोडावेळ थांबावे आणि थोडा वेळ विश्रांती घ्यावी अशी देवाची इच्छा आहे!
माझी COVID19 चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी सध्या विलगीकरणात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व औषधे व उपचार घेत आहे.
जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोविड चाचण्या करा, असं म्हणत सर्वानी काळजी घ्या असंदेखील ते म्हणाले.
Those who have come in contact with me are advised to get covid19 tests done.
Take care, everyone !— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2020




