अतिवृष्टीमुळे सांगली, सोलापुरातील खरीप पिके, भाजीपाल्यासह कोकणातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टीचा कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी घराबाहेर पडावे असे म्हटले आहे.
मनसेचे प्रवक्ते आणि नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवरुन याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं असून शेतीचं नुकसान ऑनलाइन बघता येणार नाही असंही म्हटलं आहे. “मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा. आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाइन बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या. अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल,” असं ट्विट बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.
मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) October 15, 2020




