IPL २०२० : किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅचमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव झाला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरने २० ओव्हरमध्ये ६ बाद १६४ धावा केल्या. त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबसमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले.
किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ २० ओव्हरमध्ये ५ बाद १६२ धावा करू शकला. त्यांना १६५ धावांचे आव्हान पार करणे जमले नाही. कोलकाता नाईट रायडर्सने मॅच केवळ दोन धावांनी जिंकली. कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वाधिक ५८ धावा करणारा दिनेश कार्तिक मॅन ऑफ द मॅच झाला. त्याने २९ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकार मारत ५८ धावा केल्या.



