मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या संदर्भातील माहिती स्वत: नारायण राणे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन गुरुवारी एक ट्वीट करुन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली
आपल्या ट्वीटमध्ये नारायण राणे यांनी म्हटलं, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.”
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.
— Narayan Rane (@MeNarayanRane) October 1, 2020




