Samantha Ruth Prabhu marries Raj Nidimoru at Isha Yoga Center | Photos Viral
मनोरंजन

समांथाचा राज निदिमोरूसोबत विवाह, समांथाने सोशल मीडियावर शेअर केले लग्नाचे फोटो

मुंबई : साऊथ स्टार समांथा रुथ प्रभूने बॉयफ्रेंड राज निदिमोरूसोबत विवाह करत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. १ डिसेंबर २०२५ रोजी कोइंबतूरमधील ईशा योगा सेंटर येथे त्यांच्या विवाहसोहळ्याचे पारंपरिक पद्धतीने आयोजन करण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

समांथाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत फक्त “01.12.2025” असे कॅप्शन लिहिले असून, हे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लग्नासाठी समांथाने लाल रंगाची देखणी साडी परिधान केली असून, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खुलून दिसत होता. राज आणि समांथाच्या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

समांथा आणि राज यांची ओळख ‘द फॅमिली मॅन 2’ या सीरिज दरम्यान झाली होती. मनोज बाजपेयीच्या मुख्य भूमिकेतील या लोकप्रिय सीरिजचं दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केलं होतं. याच काळात समांथाच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे बदल घडले. घटस्फोटानंतर ती आणि राज अनेकदा एकत्र दिसू लागले, मात्र नात्याबद्दल त्यांनी कधीही उघडपणे सांगितलं नव्हतं. अखेर आता त्यांनी लग्न करत आपल्या नात्याला अधिकृत नाव दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. समांथाचे पहिले लग्न अभिनेता नागा चैतन्यासोबत झाले होते, मात्र तीन-चार वर्षांतच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तर राजही काही वर्षांपासून पत्नीपासून वेगळा राहत होता.

समांथा आणि राज यांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगत असून, चाहत्यांकडून या नवदाम्पत्यावर पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत