पुणे : गणेशोत्सव २०२५ दरम्यान उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने सुधारित ड्राय डे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार दारू दुकाने, बार आणि परमिट रूमवर विशिष्ट दिवशी विक्रीबंदी राहणार आहे.
आदेशानुसार,
- २७ ऑगस्ट (गणेश चतुर्थी) व ६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) रोजी संपूर्ण जिल्ह्यात दारू विक्री पूर्णपणे बंद राहील.
- ७ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत ही बंदी कायम राहील.
याशिवाय पुणे शहरात,
- विसर्जन मार्गावरील सर्व दारू दुकाने उत्सवाच्या ५ व्या आणि ७ व्या दिवशी मिरवणूक पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
- ज्या भागात स्थानिक पातळीवर ५ वा व ७ वा दिवस विसर्जनाचे आयोजन होते, तेथील मिरवणूक मार्गावरील दुकानेही विसर्जन पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी आदेशांचे पालन करून उत्सव शांततेत व सुव्यवस्थित पार पाडावा, असे आवाहन केले आहे.




