Two workers die in explosion at ammunition company in Nagpur, investigation ordered
नागपूर महाराष्ट्र

नागपूरमध्ये दारूगोळा कंपनीत स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू, सखोल चौकशीचे निर्देश

नागपूर : नागपूरमध्ये दारूगोळा कंपनीत भीषण स्फोट होऊन दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत. काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स बारूद कंपनीमध्ये हा स्फोट झाला. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून त्यांना प्रशासनातर्फे सर्वोतोपरी मदत केली जात आहे असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. या घटनेत मृत्यू झालेल्या कामगार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जखमी कामगारांच्या उपचारात कोणतीही कमतरता पडू नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, नागपूर लगतच्या सोलार कंपनीत यापूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती. तेव्हा कंपनीतर्फे मृत कामगारांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयांची मदत करण्यात आली होती. त्याप्रकारे या कामगारांना मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत