17 School Girls Molested Near School In Just Two Hours in Nagpur
नागपूर महाराष्ट्र

विकृतीचा कळस! २ तासांत १७ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, शाळेजवळील स्टेशनरीच्या दुकानात धक्कादायक प्रकार

नागपूर : एका विकृत व्यक्तीने एका खासगी शाळेतील सुमारे १७ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांमध्येही अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खाजगी शाळा आहे. शाळेजवळ स्टेशनरीचे दुकान आहे. बुधवारी दुपारी एक शाळकरी मुलगी स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी गेली असता हा प्रकार घडला. ३६ वर्षीय रवी लाखे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी रवी हा शटर दुरुस्ती करण्याचे काम करतो. स्टेशनरी दुकानात लावलेले शटर खराब झाल्यामुळे तो दुकानात आला होता. यावेळी अवघ्या २ तासांच्या कालावधीत आरोपी रवी याने स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या सुमारे १७ मुलींशी अश्लील कृत्य करून विनयभंग केला. भीती आणि अज्ञानामुळे आरोपीचे हे घृणास्पद कृत्य त्या चिमुकल्यांना समजले नाही, त्यामुळे त्यांनी प्रतिकार देखील केला नाही. मात्र, शाळा सुटल्यानंतर काही मुलींनी घरी जाऊन घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला.

दरम्यान, संतप्त कुटुंबीयांनी प्रथम शाळा प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. सुरुवातीला काही कुटुंबातील सदस्यच तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र, त्यानंतर आरोपी रवी विरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर इतर काही मुलींनीही हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर अनेकजण पुढे आले. आत्तापर्यंत आरोपीने १७ लहान मुलींसोबत हे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेनंतर पालकांच्या मनात अस्वस्थता असून असे प्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत