Ias Pooja Khedkar Mother Manorama Khedkar Arrested From Raigad For Threatened Farmer With Gun
क्राईम महाराष्ट्र

मोठी बातमी! पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना अटक, महाडच्या हॉटेलमधून ताब्यात

रायगड : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी विविध प्रकरणे समोर आली. त्यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. मात्र दरम्यान मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या. अखेर पौड पोलिसांनी रायगडमधील एका फार्महाऊसमधून त्यांना ताब्यात घेतले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पूजा खेडकर वादात सापडल्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर या एका शेतात हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचे दिसत आहे. शिवाय, यावेळी मनोरमा यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षकदेखील होते. जमिनीच्या मालकीहक्कावरून वाद झाल्यानंतर मनोरमा खेडकर थेट हातात पिस्तुल घेऊन त्या शेतकऱ्यांना धमकावू लागल्या. त्यांच्या आयएएस मुलीचं वर्तन चर्चेचा विषय ठरल्यानंतर त्यांच्या आईचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल का दाखवले याबाबतची पार्श्वभूमी त्यांचे पती दिलीप खेडकर यांनी बोलताना सांगितले कि, माझी पत्नी मनोरमा आमच्या मालकीच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेल्या असता तिथे आठ-दहा लोकांनी पत्नीवर हल्ला केला. त्याबाबत एफआयआर दाखल केलेला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या दोन पिढ्याआधीच ती जमीन विकली गेली असून दोन तीन लोकांकडून ती आमच्यापर्यंत आली. त्यानंतरही हे शेतकरी आम्हाला तिथे जाण्यापासून अडवत आहेत. आम्हाला धमकावत आहेत.

पुढे बोलताने दिलीप खेडकर म्हटले कि, मनोरमा खेडकर यानी स्वसंरक्षणासाठी पिस्तुल बाहेर काढले होते, त्यांनी पिस्तुल कुणावरही रोखून धरलेले नाही, पोलिसांनी या प्रकरणात जरी गुन्हा दाखल केला असेल तरी त्यांना शेतकऱ्यांनी जी माहिती दिली, तीच जबाबात घ्यावी लागली. पण तपासाअंती सत्य समोर येईल. सदर पिस्तुलाचा परवाना मनोरमा यांच्या नावावरच आहे. त्यांनी स्वसंरक्षणासाठी ते पिस्तुल घेतले होते. त्यांनी पिस्तुल दाखवले असेल तरी त्यांनी ते कुणावरही रोखलेले नाही. फक्त स्वसंरक्षणासाठी ते हातात ठेवले होते. एकटी महिला दुर्गम भागात असलेल्या जमिनीची पाहणी करण्यासाठी कशी जाईल? यासाठी तिथे अंगरक्षक आणि पिस्तुल घेऊन जावे लागते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत