Ias Pooja Khedkar Mother Manorama Khedkar Arrested From Raigad For Threatened Farmer With Gun
क्राईम महाराष्ट्र

मोठी बातमी! पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना अटक, महाडच्या हॉटेलमधून ताब्यात

रायगड : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी विविध प्रकरणे समोर आली. त्यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. मात्र दरम्यान मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या. […]