The body of a person
पुणे महाराष्ट्र

चेष्टा बेतली जीवावर! पुण्यातील 16 वर्षीय मुलाचा एअर कॉम्प्रेसर प्रँकमुळे मृत्यू, गुदद्वाराद्वारे अंगात हवा भरली आणि…

पुणे : फूड प्रोसेसिंग कंपनीत काम करणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा एअर कॉम्प्रेसर प्रँकमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मुलाच्या गुदद्वाराला एअर कॉम्प्रेसरचा पाईप लावून त्याच्या अंगात हवा भरली. या अघोरी कृत्यामुळे अल्पवयीन मुलाचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा ते अकरा या दरम्यान हडपसर इंडस्ट्रीयल एरिया इस्टेट येथील पुना फ्लोअर अँड फुड्स या कंपनीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मोतीलाल साहू (वय-16) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी धीरजसिंग गोपालसिंग गौड (वय-21 रा. हडपसर इंडस्ट्रीयल एरिया इस्टेट, हडपसर) याच्यावर आयपीसी 304 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. याबाबत शंकरदिन रामदिन साहू (वय 34, रा. मूळ बडागाव, मध्य प्रदेश) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पुना प्लोअर अँड फुड्स या कंपनी काम करतात. सोमवारी सकाळी आरोपी, फिर्यादी व त्यांचा मयत भाचा कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर काम करत होते. यावेळी आरोपीने चेष्टा मस्करीत कंपनीत साफसफाईसाठी वापरत असलेल्या हवेचा एअर कॉम्प्रेसरचा पाईप फिर्यादी यांचा भाचा मोतीलाल याच्या गुदद्वाराला लावला. त्यामुळे मोतीलाल याच्या पोटात हवा भरली गेल्याने त्याच्या शरिरात गंभीर दुखापत होऊन मोतीलाल याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत