crime
क्राईम महाराष्ट्र मुंबई

कल्याणमध्ये बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची चाकूने वार करत हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कल्याण : तिसगाव परिसरात एका तरुणानं एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली. आरोपीने अल्पवयीन मुलीवर चाकूने सात ते आठ वार करत तिची हत्या केली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या आरोपीचे नाव आदित्य कांबळे (वय 20) आहे. मुलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी फिनेल प्यायला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून आरोपी मुलीचा पाठलाग करत होता. बुधवारी आरोपी अल्पवयीन मुलीच्या सोसायटीत दबा धरुन बसला होता. मुलगी रात्री आठ वाजता तिच्या आईसोबत खासगी शिकवणी वर्गावरुन घरी येत होती. सोसायटीतील जिन्यातून घरात जात असताना आदित्यने मुलीच्या आईला ढकलून देऊन मुलीवर चाकूने आठ वार केले. तिच्या आईच्या विरोधाला न जुमानता आदित्यने मुलीवर एकामागोमाग अनेक वार केले. त्यानंतर मुलगी जिन्यात कोसळली. आईने आरडाओरडा करताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आदित्य पळून जात असताना रहिवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. हल्लेखोर आदित्यने दोन वेळा प्रेमासाठी गळ घातली होती. मात्र, मुलीने त्यास नकार दिला होता. त्यातून आरोपीने हे कृत्य केले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत