Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

राज्यात आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : राज्यात आज अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत