पुणे : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील चिंतामणी गार्डन गृहरचना संस्थेच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. वर्षीही हि परंपरा कायम राखत जनसेवा फाउंडेशन भिलारेवाडी येथील अनाथ आश्रमातील मुलांना दीपावली फराळ व कपडे वाटप करण्यात आले. चिंतामणी गार्डन सोसायटीचे अध्यक्ष सुनील पाबळे यांनी सर्व १४९ फ्लॅटधारकांना स्वेच्छेने मदत निधी देण्याचे आवाहन केले होते. त्याला सर्व सभासदांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील पाबळे, संस्थेचे सचिव श्री दीपक तावडे, खजिनदार श्री जयवंत पाटील तसेच संचालक श्री मदन खुटवड, डॉक्टर संजय गायकवाड, श्री राजेन्द्र जगताप, सौ अर्चना गायकवाड तसेच श्री प्रदीप खुटवड, श्री संपतराव गावडे, श्री शिवाजी कदम, श्री संजय बोराळकर, सौ मनीषा पाबळे व माधुरी जराड उपस्थित होते याप्रसंगी जनसेवा फाउंडेशन चा कर्मचारी वर्ग उपस्थित होते




