Two helicopters collided with each other, helipad video Viral on social media
ट्रेडिंग

Video : दोन हेलिकॉप्टर धडकल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, चॉपरचे पंखे एकमेकांना भिडले आणि…

Helicopter Accident Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन हेलिकॉप्टर एकमेकांना धडकताना दिसत आहेत. दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्यानंतर त्यांचे मोठे नुकसान झाले, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यात एका हेलिकॉप्टरने लॅन्ड करताना तेथेच थांबलेल्या दुसऱ्या हेलिकॉप्टरला धक्का दिला आणि दोन्ही हेलिकॉप्टरचा चुराडा झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोशल मीडियावर अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडिओ व्हायरल होतात. परंतु हेलिपॅडवर झालेला अपघात ऐकणे किंवा पाहणे फारच दुर्मिळ आहे. सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये एक हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उभं असून ते टेक ऑफ करणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या हेलिकॉप्टरचे पंखे फिरत असल्याचे तुम्हाला दिसेल. त्याच वेळी, त्याच हेलिपॅडवर आणखी एक हेलिकॉप्टर उतरताना दिसेल. मात्र यावेळी बाजूला उतरलेल्या आणि थांबलेल्या चॉपरचे पंखे एकमेकांना भिडले. पाहताक्षणी दोन्ही हेलिकॉप्टरचा चुराडा झाला. कॅलिफोर्नियात घडलेल्या या अपघातामध्ये कोणत्याही पायलटला गंभीर दुखापत झालेली नाही.

लँडिंग दरम्यान, पायलट एक मोठी चूक करतो. त्याला दोन हेलिकॉप्टरमधील अंतराचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे दोन्ही हेलिकॉप्टरचे पंखे एकमेकांवर आदळले. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेयर केल्यानंतर लगेच व्हायरल झाला आहे. कॅलिफोर्नियाच्या पोलिस मुख्यालयाजवळ तैनात असलेले हे चॉपर Bell OH-58 होते. दोन्ही चॉपरचे पंख एकमेकांना भिडल्याने हा अपघात घडला. मात्र, त्यानंतर पायलट त्यातून सुखरूप बाहेर निघाले. त्या दोघांनाही यात किरकोळ जखमा झाल्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत