prostitute lover comes home drunk boyfriend killed incident in bhiwandi
बीड महाराष्ट्र

मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जाब विचारला म्हणून महिलेची हत्या, बीडमधील खळबळजनक घटना

बीड : बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारून त्याला विरोध केल्यामुळे आरोपीने चाकूने भोकसून महिलेची हत्या केली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या तांडा येथे राहणाऱ्या अनिता राठोड या आपल्या पतीसह देवाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या तीन मुली घरीच होत्या. याच गोष्टीचा फायदा घेत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या बबन चव्हाण नावाच्या व्यक्तीने त्यांच्या घरी येऊन त्यांच्या मुलींचा विनयभंग केला. दरम्यान, आई-वडील देवदर्शन करून परत आल्यानंतर मुलींनी या संपूर्ण घटनेची माहिती त्यांना दिली. त्यानंतर त्यांनी आरोपी बबनचे घर गाठून त्याला सुनावले आणि पुन्हा असे करू नये असे सांगितले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा वाद इतका वाढला की, मंगळवारी बबन, त्याचे वडील आणि भाऊ सचिन यांच्यासह अन्य तीन जणांनी राठोड यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली. दरम्यान, वैजनाथ राठोड यांना वाचवण्यासाठी नातेवाईकांनी त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले. मात्र एका आरोपीने त्यांची पत्नी अनिता राठोड यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी याप्रकरणी चार पथके तयार केली आहेत. यासोबतच मुख्य आरोपी बबनला अटक करण्यात आली आहे. तर त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आता इतर चार आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत