हैदराबाद : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे, ज्याची माहिती तिने स्वतः दिली आहे. दिया मिर्झाची भाची तान्या काकडे हिचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, दियाच्या भाचीचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. तान्या सोमवारी सकाळी हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळावरून तिच्या मित्रांसह घरी जात असताना तिच्या कारला अपघात झाला.
दीया आपल्या भाचीच्या मृत्यूने खूप दु:खी आहे. तिने तान्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत एक अतिशय भावूक आणि हृदयाला स्पर्श करणारी नोट लिहिली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करत दिया मिर्झाने कॅप्शनमध्ये लिहिले – माझी भाची.. माझे बाळ.. माझी प्रिय.. आता या जगात नाही. तु कुठेही असशील, तुला शांती आणि प्रेम मिळो… तु नेहमी आमच्या हृदयात राहशील. ओम शांती.
View this post on Instagram
दिया मिर्झाला तिची भाची तान्याच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. दिया मिर्झाच्या या पोस्टनंतर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच यावर रिप्लाय देत आहेत आणि श्रद्धांजली वाहत आहेत.




