crime
ठाणे महाराष्ट्र

ठाण्यात खळबळ! वडिलांनी पाच वर्षांच्या मुलाला दिले सिगारेटचे चटके, धक्कादायक कारण आलं समोर…

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे एका व्यक्तीने आपल्या पाच वर्षांच्या मुलाला आईला भेटू नये म्हणून सिगारेटने चटके दिले, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. याप्रकरणी मुलाच्या आईने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी सांगितले की, “आरोपी फहीम रिझवान अहमद खान (वय 33) आणि त्याची पत्नी सननुर आलम शेख (वय 29) हे कौटुंबिक वादामुळे वेगळे झाले आहेत आणि त्यांचा मुलगा गेल्या सात महिन्यांपासून त्याच्या वडिलांसोबत राहत होता. सोमवारी मुलाची आई त्याला भेटायला गेली होती. तेव्हा मुलाने आईला सांगितले की त्याचे वडील सिगारेटने त्याच्या शरीरावर चटके द्यायचे, अनेक वेळा मारहाण करायचे आणि तो त्याच्या आईकडे परत जाऊ नये म्हणून त्याच्या मनात दहशत निर्माण करायचे. मुलाच्या आईने मंगळवारी सिगारेटने आपल्या मुलाला जाणीवपूर्वक इजा केल्याबद्दल आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.”

राऊत पुढे म्हणाले की “आम्ही फहिम खानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आत्तापर्यंत आम्ही त्याला अटक केलेली नाही पण नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यानंतर तो स्वत: पोलिसात येईल, अन्यथा आम्हाला त्याला अटक करावी लागेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत