World Athletics Championships: Neeraj Chopra Javelin Throw
क्रीडा

क्रीडा रसिकांना मोठा धक्का! नीरज चोप्राची राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार, कारण…

बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी मजबूत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. जागतिक ऍथलेटिक्समध्ये रौप्य पदकाची कमाई करणारा नीरज दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही. टोकियो ऑलिम्पिक गाजवणारा नीरज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकेल अशी खात्री क्रीडा रसिकांना वाटत होती. मात्र आपण दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नसल्याचं नीरजनं सांगितलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेनंतर नीरज चोप्राचं एमआरआय स्कॅन करण्यात आलं. त्यात त्याच्या स्नायूला दुखापत झाल्याचं निदान झालं. त्यामुळे डॉक्टरांनी नीरजला महिनाभर आराम करण्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेला ५ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. याच दिवशी भालाफेक स्पर्धा होईल.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नीरजकडून मोठ्या अपेक्षा होत्या. टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्ण पदक पटकावलं. वैयक्तिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा नीरज हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता, कारण त्याने गोल्ड कोस्ट येथे 2018 च्या गेम्समध्ये सुवर्ण जिंकले होते. काही दिवसांपूर्वीच जागतिक ऍथलेटिक्समध्ये निरांजने रौप्य पदकाची कमाई केली. मात्र, आता नीरज दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत