नवी दिल्ली : देशातील दूरसंचार कंपन्या सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करायचे असेल, तर तुमच्यासाठीही प्लॅन आहे आणि तुम्हाला एक वर्षाची वैधता असलेला प्लॅन हवा असेल तर अशा योजना देखील उपलब्ध आहेत. बहुतेक ग्राहकांना एक वर्षाच्या वैधतेसह प्रीपेड योजना आवडतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना वर्षभरात वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासातून सुटका मिळते आणि अनेक उत्तम फायदे या प्लॅन्सना अधिक आकर्षक बनवतात.
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओकडे असे अनेक जबरदस्त प्लॅन आहेत. Jio चा हा प्रीपेड प्लान 4199 रुपयांना उपलब्ध आहे. एका वर्षाच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये, कंपनी दररोज 3GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह Disney + Hotstar Premium वर मोफत प्रवेश देखील देत आहे. त्याच वेळी, Jio च्या या प्लॅनची तुलना या बजेटमध्ये येणाऱ्या Vodafone Idea आणि Airtel च्या प्रीपेड प्लॅनशी केली जाऊ शकते.
आज आपण रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेलच्या एक वर्षभर वैधता असलेल्या प्रीपेड प्लॅन्सबद्दल तपशीलवार माहिती घेऊ.
जिओचा ४१९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन :
जिओचा ४१९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ३६५ दिवसांची वैधता देतो. डेटाबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लानमध्ये दररोज 3GB डेटा मिळतो, जो एकूण 1095 GB डेटा बसतो. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 100 एसएमएस मोफत देते. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. तसेच, डिस्ने + हॉटस्टार प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील या प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी उपलब्ध आहे.
एअरटेलचा 3359 रुपयांचा प्रीपेड प्लॅन :
एअरटेलचा 3359 रुपयांचा प्रीपेड प्लॅन वर्षभर वैधता ऑफर करतो. यामध्ये दररोज 2.5GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. यामध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिले जाते. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी Disney + Hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
Vodafone Idea चा Rs 3099 प्रीपेड प्लान :
Vodafone Idea च्या Rs 3099 च्या प्रीपेड प्लान मध्ये रोज 2.5GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. दररोज 100 SMS विनामूल्य उपलब्ध आहेत. सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. यामध्ये Binge ऑल नाईट डेटा उपलब्ध आहे, ज्यामध्ये 12 ते सकाळी 6 या वेळेत अमर्यादित डेटा सर्फिंग उपलब्ध आहे, आठवड्याच्या दिवसात शिल्लक राहिलेला डेटा शनिवार आणि रविवारी वीकेंड डेटा रोलओव्हर अंतर्गत वापरता येईल आणि याशिवाय डेटा डिलाइट सारखे फायदेही मिळतात. स्ट्रीमिंग फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Disney + Hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील दिलेले आहे.




