Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई राजकारण

ब्रेकिंग! एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातून बाहेर राहणार

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही, तर एकनाथ शिंदे असतील. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. आज फक्त एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातून मी बाहेर राहणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या गटासह सत्तास्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. आज सायंकाळी ७.30 वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वीच मुंबईत दाखल झाले. यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी पोहोचले. सागर बंगल्यावर रविंद्र चव्हाण, पराग अळवणी, मंगलप्रभात लोढा, उदयनराजे भोसले हे भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. तिथून हे सर्वजण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. त्यानंतर आज संध्याकाळी ७.30 वाजता भाजप सरकारचा शपथविधी होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत