पुणे : सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ तटबंदीच्या खालच्या भागातील दरड पायवाटेवर कोसळली. या दुर्घटनेत दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. हेमांग गाला असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमांग आणि त्याचे मित्र काल (२५ जून) ट्रेकिंगसाठी सकाळी सिंहगड चढण्यासाठी आले होते. येथे दाट धुके पसरलेले होते. दरम्यान अचानक दरड कोसळली. या घटनेनंतर हेमांग गाला बेपत्ता झाले. त्यामुळे त्यांच्या मित्रांनी तात्काळ त्यांचा शोध सुरु केला. याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि शोधकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर काल रात्री 11.30 च्या सुमारास हेमांग गाला यांचा मृतदेह दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडला. या दुर्घटनेत हेमांग गाला यांचा दुर्देवी मृत्यू झाला.




