पुणे : सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ तटबंदीच्या खालच्या भागातील दरड पायवाटेवर कोसळली. या दुर्घटनेत दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. हेमांग गाला असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेमांग आणि त्याचे मित्र काल (२५ जून) ट्रेकिंगसाठी सकाळी सिंहगड चढण्यासाठी आले होते. येथे दाट धुके पसरलेले होते. दरम्यान अचानक दरड कोसळली. या घटनेनंतर […]

