Actor Karan Tucker infected with corona
मनोरंजन

अभिनेता करण टकरला कोरोनाची लागण

मुंबई : अभिनेता करण टकरला कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी, अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर ही बातमी त्याच्या चाहत्यांसह शेयर केली. ‘एक हजारों में मेरी बहना है’ फेम करण टॅकरने एक व्हिडिओ टाकला ज्यामध्ये तो गेल्या दोन वर्षांपासून व्हायरसपासून कसा सुरक्षित होता याबद्दल बोलला, पण आता त्याला संसर्ग झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तो म्हणाला कि, “मी दोन वर्षे या विषाणूपासून दूर राहिलो, पण हा कोविड धीट ठरला, शेवटी माझ्यापेक्षा वरचढ ठरला आणि माझ्यावर हल्ला केला. खोकला आणि शिंकणे मला हृदयाचे ठोके चुकवायला लावते, मात्र, वेदना आणि थंडी मला मी नश्वर असल्याची जाणीव करून देतात. मास्क घाला, चीटिंग करण्याचा प्रयत्न करू नका, लस, बूस्टर, मास्क, रिपीट.” व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, करण टकरने जे लोक त्याच्या जवळच्या संपर्कात आले असतील, त्यांना त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Tacker (@karantacker)

करणचे अनेक चाहते आणि इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास करण टकर अलीकडेच स्पेशल ऑप्समध्ये दिसला होता. या मालिकेत त्याने फारुख अली नावाच्या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली होती. या शोमध्ये के के मेनन, सज्जाद डेलाफ्रूज, गौतमी कपूर आणि सना खान यांनी देखील भूमिका केल्या होत्या. याशिवाय करण टकरने एक हजारों में मेरी बहना है आणि रंग बदलती ओढणी यासह अनेक शोमध्ये काम केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत