Stray dogs
देश

निष्काळजीपणाचा कळस! कुत्रा रुग्णालयातून रूग्णाचा कापलेला हात घेऊन पळाला, तरुणाला कायमच अपंगत्व…

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एक व्यक्तीला आयुष्यभरासाठी अपंगत्व आले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अपघातात एका व्यक्तीचा हात कोपरापासून वेगळा झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, ऑपरेशन करुन हा हात पुन्हा जोडता येऊ शकतो. मात्र, रात्री उशिरा जेव्हा ऑपरेशनसाठी कापलेल्या हाताचा शोध सुरू झाला तेव्हा येथील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला, कारण एक कुत्रा रुग्णालयात शिरून हा हात घेऊन गेला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फूलबाडी जंक्शनवर टी-पार्कजवळ डबग्राम भागातील रहिवासी संजय सरकार यांचा रस्ता अपघातात एक हात तुटला. रूग्णाचा कापलेला हात रूग्णालयातील सुविधेत जतन करून ठेवला जाईल आणि हात लवकरच जोडला जाईल, असे आश्वासन डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिले होते.

दरम्यान, प्राथमिक उपचारानंतर त्याचा हात एका बॅगेत पॅक करून ऑर्थोपॅडिक सर्जरी विभागात पाठवण्यात आला होता. यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, हात पुन्हा जोडला जाऊ शकतो. मात्र, रुग्णाला वॉर्डात दाखल केल्यानंतर त्याचा अर्धवट कापलेला हात सापडत नव्हता. अखेर बराच वेळ शोधल्यानंतर गच्चीवर एक कुत्रा छिन्नविछिन्न कापलेला हात खाताना दिसला.

सोमवारी सकाळी कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या अधिक्षकांना घेरलं आणि रुग्णालयात आंदोलन केलं. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाला कायमच अपंगत्व आलं आहे. या प्रकरणात नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे अधीक्षक संजय मलिक यांनी या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत