जळगाव : जळगावमध्ये मुक्ताईनगरच्या घोडसगावाजवळ बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्या टँकरमध्ये दुध टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या टँकर आणि क्रेनला धडक दिली. यामध्ये पाच जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर घोडसगावाजवळ हायवे क्रमांक ६ वर दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. अपघातात ५ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले ४ जण धुळे जिल्ह्यातील असून १ व्यक्ती जळगाव येथील आहे. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस घटनास्थळी पंचनामा करत आहेत. तर पोलिसांनी ५ मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.




