mns chief raj thakre
अहिल्यानगर महाराष्ट्र राजकारण

राज ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांवर धडकल्या

अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. राज ठाकरे यांच्या ताफ्यातील मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांवर धडकल्याचे समजते. दोन गाड्यांच्या बोनेटचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव (ता. नेवासा) येथे ही घटना घडली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीच्या बोनेटचं नुकसान झालं. राज यांच्या ताफ्यात केदार आणि अंकुशही आहेत. राज ठाकरे हजारो कार्यकर्त्यांसह पुण्याहून औरंगाबादकडे रवाना होत असताना रस्त्यात हा अपघात झाला. या किरकोळ अपघातानंतर सर्वजण औरंगाबादकडे रवाना झाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत