नवी दिल्ली : आता 6-12 वर्षांच्या मुलांनाही कोरोना लसीचा डोस दिला जाणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने मंगळवारी त्याची मंजुरी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकच्या कोरोना लसीचा डोस ‘कोव्हॅक्सीन’ मुलांना दिला जाणार आहे.
गेल्या आठवड्यात, DCGI च्या विषय तज्ञ समितीने (SEC) शाळांमध्ये वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनची शिफारस केली होती. ही शिफारस अंतिम निर्णयासाठी डीसीजीआयकडे पाठवण्यात आली होती. DCGI ने भारत बायोटेकची कोरोना लस, कोवॅक्सीनला 6 ते 12 वर्षे वयोगटासाठी काही अटींसह प्रतिबंधित आणीबाणीच्या वापरास मान्यता दिली आहे. तसेच 5-12 वयोगटातील मुलांसाठी Corbevax ला मान्यता दिली आहे.




