man murdered by accused who wants to kill his daughter in law
क्राईम देश

2 मुलांचा बाप असलेला व्यक्ती पडला 14 वर्षीय मुलीच्या प्रेमात, त्यानंतर उचलले ‘हे’ भयंकर पाऊल

मध्य प्रदेश : 2 मुलांचा बाप असलेला व्यक्ती एका 14 वर्षीय मुलीच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर त्याने अतिशय भयंकर कृत्य केले. या व्यक्तीने एकतर्फी प्रेमप्रकरणातून या 14 वर्षीय मुलीवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. जखमी मुलीला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून गुन्हेगाराच्या मृत्यूप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील खिमलासा, खुराई, सागर येथे ही धक्कादायक घटना घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, खुराई येथील खिमलासा येथे एकतर्फी प्रेमप्रकरणातून दोन मुलांच्या बापाने 14 वर्षीय मुलीवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. जखमी मुलीच्या लहान भावाने सांगितले की, तो आणि त्याची बहीण पलक घराबाहेर बसले होते. यावेळी रामजी यादव याने येऊन त्यांना पिस्तुलचा धाक दाखवत जबरदस्तीने मोटारसायकलवर शेतात नेले. तेथे त्याने पलकला मारहाणही केली. त्याने बंदुक काढल्यानंतर पलक पळू लागली, तेव्हा त्याने तिच्या पाठीत गोळी झाडली. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

जखमी मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, गुन्हेगार रामजी यादव हा प्रत्यक्षात पलकच्या वडिलांचा मित्र होता. काही महिन्यांपूर्वी पलकच्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हापासून रामजी यादव याची पलकवर वाईट नजर होती. होळीच्या वेळी रामजी यादवने पलकवरून संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली होती. त्यावेळी त्यांनी गुन्हा देखील दाखल केला होता. मात्र त्याने पलकचा पाठलाग सोडला नाही आणि आता हा भयंकर गुन्हा घडला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत