Kirtankar Maharaj Video Clip Viral Shillegaon Police Station Register Complaint
छत्रपती संभाजी नगर ट्रेडिंग महाराष्ट्र

किर्तनकार ‘बाबाचा पॉर्न व्हिडिओ’ जाणून घ्या व्हिडीओ बाहेर आला कसा? सत्य आले समोर..

औरंगाबाद : जिल्ह्यातील एका किर्तनकाराचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एका महिला किर्तनकार महिलेसोबत हे किर्तनकार ‘शरीरसंबंध’ करताना स्पष्टपणे दिसत आहे. पण हा व्हिडीओ बाहेर आला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ हा दोघांपैकी एकाच्या मोबाइलमध्ये असणार मग तो समाज माध्यमात व्हायरल कसा झाला असाही प्रश्न उपस्थितीत होत आहे. पण याचं खरं कारण आता समोर आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वैजापूर तालुक्यातील किर्तनकार असलेले महाराज सोशल मीडियामुळे महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झाले होते. सदर महाराजांकडे किर्तन ठरविण्यासाठी काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच यापूर्वीचे कार्यक्रमाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा ते ग्रामस्थांना दाखवता येईल असं सांगितलं होतं. त्यावर महाराजाकडून किर्तनाच्या व्हिडिओसोबत तो आक्षेपार्ह व्हिडिओदेखील चुकून पाठवला गेला आणि महाराजांचा व्हिडिओ पाहता-पाहता महाराष्ट्रभर पोहचला.

व्हिडिओमध्ये महाराजांसोबत ‘शरीरसंबंध’ ठेवताना दिसणारी महिला सुद्धा त्यांच्याच क्षेत्रात काम करणारी त्यांची सहकारी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातीलच आहे. विशेष म्हणजे महिलेने नशा केला असावा, असे व्हिडिओत दिसत आहे. या महिलेला स्पष्टपणे बोलता येत नव्हते आणि सतत डोक्याला हात मारुन डोकं दुःखत असल्याचं व्हिडिओतील संभाषणत दिसत आहे. पण यावर अजूनही अधिकृतपणे कुणीही बोलायला समोर आलेलं नाही. व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे पण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

वारकरी संप्रदायाकडून कारवाईची मागणी
किर्तनकार महाराजांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडिओमध्ये असलेल्या किर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपल्या किर्तनातून भक्ती व समाजप्रबोधन करत असल्यामुळे लाखो लोक त्यांना धार्मिक क्षेत्रात आपले आदर्श मानतात. आनंद संप्रदायिक असूनही बरेच वारकरीही त्यांना आपले आदर्श मानत आणि आपापल्या परिसरात त्यांचे किर्तनाचेही आयोजन करतात. मात्र या दोघांनीही त्या लाखो श्रध्दाळू लोकांच्या धार्मिक भावनांवर खूप मोठा आघात केला. महाराष्ट्रातील लोकांची आस्था आपल्या असभ्य वर्तनुकीचे अश्लील प्रदर्शन करून त्यांनी ती आस्था पायदळी तुडविली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत