उत्तर प्रदेश : 23 वर्षीय एड्स बाधित महिलेला तिच्या 15 वर्षीय पुतण्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. व्हायरसचा संसर्ग करण्याच्या उद्देशाने तिने पुतण्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी मुलाच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे महिलेला अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या महिलेच्या पतीचा एड्सने मृत्यू झाला, त्यानंतर ती उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील तिच्या गावी गेली होती. शोकविधीनुसार तिचा पुतण्या गेल्या महिन्यात होळीच्या सुमारास तिथे गेला होता. घरी परतण्यापूर्वी महिलेने त्याच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. काही दिवसांनंतर, 30 मार्च रोजी, महिला पुन्हा मुलाला भेटण्यासाठी उधम सिंह नगर येथे गेली. तिने अनेकवेळा त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिने पीडित मुलाला धमकी दिली की कोणाला याबाबत सांगितले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.”
पोलिसांनी सांगितले की, महिलेचा नवरा एड्सने मरण पावला होता आणि तिलाही संसर्ग झाला होता. तिच्या पतीच्या भावाचे कुटुंब मात्र व्यवस्थित होते. हा मुलगा तिच्या पतीच्या मोठ्या भावाचा मुलगा होता. 2 एप्रिल रोजी, आरोपी महिलेला पीडित मुलाच्या आईने कथितपणे धमकावताना पकडले होते. त्यानंतर मुलाने त्याच्या आईला सर्व काही सांगितले. त्यानंतर त्याच दिवशी मुलाच्या दोन्ही पालकांनी आरोपी महिलेविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिला अटक करून स्थानिक न्यायालयात हजर केले, त्यानंतर तिला तुरुंगात पाठवण्यात आले.




